औरंगाबाद- चाटे कोचिंग क्लासेसमध्ये पाणी पिण्यासाठी क्लासरूम मधून बाहेर आलेल्या दहावीतील विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गमित्राने धारदार वस्तूने हल्ला केल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना उलकानगरी येथील चाटे कोचिंग क्लास मध्ये घडली.
गणेश सुनील काळे वय 16 (रा उल्कानगरी)
असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. या बाबत
जखमी विद्यार्थ्यांचे वडील सुनील काळे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, गणेश हा क्लासेस मध्ये गेला होता
त्याची क्लास मध्ये परीक्षा होती दरम्यान तो पाणी पिण्यासाठी पायऱ्याकडे जात
असताना पाठीमागून येत असणाऱ्या अल्पवयीन
वर्गमित्राने धारदार वस्तूने गणेशवर हल्ला केला
या हल्ल्यात गणेश रक्तबंबाळ होऊन तेथेच पडला हा प्रकार माहिती होताच शिक्षक
व इतर कर्मचार्यांनी गणेश ला तातडीने रुग्णालयात हलविले शहानुर मियाँ दर्गा
परिसरातील एका खाजगी रुग्णालयात गणेशवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.